यवतमाळ - जिल्ह्यातील मारेगाव शहरात 11 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन मारेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक केली आहे. मोहम्मद ईद्रीस शेख अब्दुल शेख (वय 52 रा.मारेगाव) असे नराधम आरोपीचे नाव आहे.
आरोपीस कठोर शिक्षा करण्याची शहरातील नागरिकांची मागणी. शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील आरोपीच्या घराजवळ पीडित 11 वर्षीय बलिकेचे घर आहे. पीडितेचे वडील घराला रंग मारण्याचे काम करतात. आरोपीने घराला रंग मारण्यासाठी तिच्या वडिलांना घरी बोलवले होते. मुलगी वडिलांसोबत आरोपीच्या घरी गेली असता आरोपी ईद्रीस शेख याने तिला दुसऱ्या खोलीत बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
मुलगी घरी गेल्यावर भीतीने घाबरून होती व त्रास होत असल्यामुळे बसून होती. दरम्यान, आईने काय झाले असे विचारल्यावर तिने आपल्या सोबत घडलेला सर्व प्रकार रडत-रडत आईला सांगितला. पीडितेच्या आईने तत्काळ मारेगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी मोहम्मद ईद्रीस शेख अब्दुल शेख याच्यावर 354-A, बाललैंगिक अत्याचार कलम 8/12 अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.
शहरातील नागरिकांनी पोलीस स्थानकासमोर जमाव करुन शहरात घडलेल्या घटनेचा निषेध केला. आरोपीवर कडक करवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नाईक यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आर.डी.वटाने व अमोल चौधरी करीत आहेत.