यवतमाळ - पावसाचे आगमन उशिराने का होईना परंतु अतिशय जोरात झाला आहे. यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील एकमात्र मध्यम प्रकल्पाचे सायखेडा धरण पूर्णपणे भरून ओसंडून वाहत आहे. केळापूर तालुक्यातील नागरिकांसाठी सायखेडा येथील मध्यम प्रकल्पाचे धरण पिण्याच्या पाण्याचे एकमेव जलस्रोत बनले आहेत. शेतकर्यांना शेती करण्यासाठी धरणातील पाणी अतिशय उपयुक्त ठरत असून तालुक्यातील 140 गावांना याच धरणातील पाण्याचा मुख्य आधार मिळत आहे.
पांढरकवडा येथील सायखेडा धरण 'ओव्हरफ्लो'
यावर्षी मान्सूनच आगमन खूपच उशिराने झाले, पावसाने पाठ फिरविल्याने सर्वत्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, उशिराने का होईना सर्वंच ठिकाणी दमदार पाऊस पडल्याने तालुक्यातील एकमात्र मध्यम प्रकल्पाचे सायखेडा धरण शंभर टक्के भरले.
पावसाच्या पाण्यामुळे सायखेडा धरण दरवर्षीच भरून ओसंडून वाहत असते. मात्र, येथील धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला असून पाटबंधारे विभागातर्फे दरवर्षी धरणात साचलेल्या गाळाचा उपसा करण्यासाठी कोणतीही खास उपाययोजना करण्यात येत नाही. यावर्षी मान्सूनच आगमन खूपच उशिराने झाले, पावसाने पाठ फिरविल्याने सर्वत्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, उशिराने का होईना सर्वंच ठिकाणी दमदार पाऊस पडल्याने तालुक्यातील एकमात्र मध्यम प्रकल्पाचे सायखेडा धरण शंभर टक्के भरले. धरणाच्या भिंतीवरून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे. सायखेडा धरण शंभर टक्के भरल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत असून नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील आता मिटलेला आहे.