महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सावकारी पाश : 9 वर्षापासून घेतलेले २५ हजार फिटेना, कर्जासाठी बळीराजा पुन्हा सावकाराच्या दारी - शेतकरी

शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ अद्यापही मिळाला नाही. बँका कर्ज देत नाहीत. त्यामुळे शेतकरी मोठ्या विंवचनेत अडकला आहे. पैशासाठी बळीराजाला सावकारांकडे हात पसरावे लागत आहेत.

का कर्ज देत नसल्याने बळीराजा सावकाराच्या दारी

By

Published : Jul 31, 2019, 2:19 PM IST

Updated : Jul 31, 2019, 3:02 PM IST

यवतमाळ - शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ अद्यापही मिळाला नाही. बँका कर्ज देत नाहीत. त्यामुळे शेतकरी मोठ्या विंवचनेत अडकला आहे. काळ्या आईला हिरवा शालू पांघरण्यासाठी बळीराजाला पैशाची तजवीज कुठून तरी करावीच लागेल. त्यामुळे पैशासाठी बळीराजाला सावकारांकडे हात पसरावे लागत आहे.


जुलै महिना संपत आला तरी यवतमाळ जिल्ह्यातील पावसाचा खंड वाढतच आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली. त्यातच कापूस, सोयाबीन पिकांच्या पेरणीचा कालावधीही उलटून गेल्याने जिल्ह्यातील ९० टक्के शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. पिकाच्या बाबतीत अशी परिस्थिती विदर्भातील अन्य जिल्ह्यांतही दिसून येत आहे.

बँका कर्ज देत नसल्याने बळीराजा सावकाराच्या दारी


महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेले पांढरकवडा तालुक्यातील वांजरी हे १ हजार लोक वस्तीचे आदिवासी बहुल गाव आहे. या गावातील शेतकरी तानबाजी पालटे यांनी 2010 मध्ये गावातच असलेल्या महाराष्ट्र बँकेच्या शाखेकडून तीन एकर शेती कसण्यासाठी 25 हजार रुपयांच्या कर्जाची उचल घेतली होती. मात्र, उत्पन्नात घट असल्याने ते पीक कर्जाची परतफेड करु शकले नाही. जिल्ह्यात दुष्काळ असल्याने शासनाने कर्जाचे पुनर्गठन केले. मात्र, त्यांची रक्कम अद्याप मिळाली नाही. मागील ९ वर्षापासून या घेतलेल्या २५ हजाराच्या रकमेवर व्याज वाढत चालले आहे. त्यामुळे तानाजी पालटे यांना कर्ज देण्यास बँक तयार नाही.

अद्यापही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नसल्याने सावकाराकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे, हा प्रश्न बळीराजाला भडसावत आहे. शासनाने जाहीर केलेली दीड लाखापर्यंतची कर्जमाफी मिळावी इतकीच रास्त मागणी या शेतकऱ्यांची आहे. शेतीची मशागत उन्हाळ्यात करून ठेवली मात्र, बँकेने आणि शासनाने शेवटी वाऱ्यावर सोडले आहे. उदरनिर्वाहासाठी शेती कसावीच लागणार आहे, मात्र, कर्जाचा डोंगर वाढत असल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे.

Last Updated : Jul 31, 2019, 3:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details