यवतमाळ- वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल असलेल्या 118 लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यापैकी 26 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुढील 14 दिवस त्यांना गृह विलगीकरणात आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिली.
आयसोलेशन वॉर्डातील 118 लोकांचे अहवाल निगेटिव्ह; 26 जणांना सुट्टी - yavatmal corona news
प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुढील 14 दिवस त्यांना गृह विलगीकरणात आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिली.
गेल्या 24 तासांत 3 जण आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती झाले आहेत. सद्यस्थितीत एकूण 75 जण भरती आहेत. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाला एकूण 118 निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाले, तर 13 रिपोर्टचे निश्चित काही सांगता येत नसल्यामुळे हे 13 नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.
आयसोलेशन वॉर्डमध्ये पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 10 आहे. गुरुवारी एकूण 136 नमुने तापसणीसाठी नागपूरला पाठवण्यात आले आहेत. गृह विलगीकरणात एकूण 152 जण असून संस्थात्मक विलगीकरणाअंतर्गत अल्पसंख्यांक मुलींच्या वसतीगृहात 104 जण ठेवण्यात आले आहेत.