यवतमाळ -कोरोनामुळे देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व व्यवहार आणि व्यवसाय बंद झाले आहेत. काम मिळत नसल्याने मजूर वर्ग मिळेल त्या वाहनाने जीव धोक्यात घालून गावाकडे प्रवास करत आहे. पांढरकवडा पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान सहा वाहनांतून 118 मजुरांची वाहतूक होत असल्याचे समोर आले. या प्रकरणी वाहन चालकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शेजारील तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांत कामासाठी गेलेले मजूर आता आपल्या गावाकडे परतण्याच्या प्रयत्नात आहेत. ठेकेदारांनी मजुरीचे पैसे न दिल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊन असल्याने हे मजूर चोरट्या मार्गाने जात आहेत. मात्र, चेक पोस्टवर तपासणी होत असली तरी मजुरांच्या वाहतुकीला आळा बसेलेला नाही.