यवतमाळ - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणांमध्ये वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप होत आहेत. या प्रकरणाला तब्बल वीस दिवस झाले. रविवारी वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला. यानंतर जिल्ह्यातील शिवसेना समर्थकांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय राजीनामा मंजूर करुन नये, अशी मागणी केली आहे.
राठोड सर्व समाजाचे प्रतिनिधित्व करणारे
आमदार संजय राठोड हे बंजारा समाजाचे असले तरी सर्व समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेते आहेत. मागील वीस वर्षापासून दारव्हा-दिग्रस मतदार संघाचा जो कायापालट झाला जे विकास झालेला आहे तो राठोड यांच्या मुळेच झालेला आहे. या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस तपासही करत आहेत. या तपासाचा निष्कर्ष निघण्यापूर्वीच राठोड यांचा राजीनामा घेणे चुकीचे असल्याचे समर्थकांनी सांगितले.