यवतमाळ - सध्या सुरू असलेल्या घडामोडी बघता राज्य सरकार पन्नास दिवस तरी टिकणार का, असा उपरोधिक प्रश्न केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. दौऱ्यादरम्यान त्यांनी शहरातील शासकीय निवासस्थानात पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी भाजप तीन वर्षे आणि शिवसेना दोन वर्षे असा सत्ता स्थापन करण्याचा फार्मूला ठरल्याची माहिती आठवले यांनी दिली. परंतु, तसे न झाल्याने भाजपला सत्ता गमवावी लागली, असे ते म्हणाले.
राज्य सरकार ५० दिवस तरी टिकणार का? रामदास आठवलेंचा उपरोधिक प्रश्न - ramdas athavle in yavatmal
सद्या सुरू असलेल्या घडामोडी बघता राज्य सरकार पन्नास दिवस तरी टिकणार का, असा उपरोधिक प्रश्न केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल विधान केले होते. यावरुन हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला. यावर बोलताना, काँग्रेस आणि सेनेत सावकरांबद्दल कायमच मतभेद असल्याचे त्यांनी सांगितले. सावरकरांचे देशाच्या जडणघडणीत योगदान असून राहुल गांधी यांनी घेतलेली भूमिका न पटणारी असल्याचे ते म्हणाले. तसेच याच मुद्यावर काँग्रेसने सेनेचा पाठिंबा काढला पाहिजे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना, भाजप आणि शिवसेनेने एकत्र यावे, ही रिपाईची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.