महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सेव्ह मेरिट सेव्ह नेशन; 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण नको, विराट मोर्चाने वेधले नागरिकांचे लक्ष

खुल्या प्रवर्गाला मिळालेल्या 22 टक्क्यांमध्येही आरक्षण मिळालेला समाज अर्ज करतोय. यामुळे खुल्या प्रवर्गातील गुणवंतांना डावलले जात आहे. या आरक्षणाच्या टक्केवारीत गुणवंत लोक मागे पडत असून त्याची कदर सरकार न करता आरक्षण देत आहे, असे या मोर्चेकऱ्यांनी म्हटले आहे.

सेव्ह मेरिट सेव्ह नेशन; 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण नको, विराट मोर्चाने वेधले नागरिकांचे लक्ष

By

Published : Aug 9, 2019, 3:43 PM IST

यवतमाळ -राज्यात सध्या सर्वच समाजांतून आरक्षणाची मागणी होत आहे. नुकतेच सरकरने काही समाजाला आरक्षण जाहीर केले. यामुळे राज्यसरकारने आरक्षण देऊन 50 टक्क्याची मर्यादा ओलांडली आहे. ते आता 78 टक्क्यावर पोहचले आहे. यामुळे आता 78 टक्के खुला प्रवर्ग 22 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी आज क्रांतिदिनी सेव्ह मेरिट सेव्ह नेशन कृती समितीकडून विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

सेव्ह मेरिट सेव्ह नेशन; 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण नको, विराट मोर्चाने वेधले नागरिकांचे लक्ष

खुल्या प्रवर्गाला मिळालेल्या 22 टक्क्यांमध्येही आरक्षण मिळालेला समाज अर्ज करतोय. यामुळे खुल्या प्रवर्गातील गुणवंतांना डावलले जात आहे. या आरक्षणाच्या टक्केवारीत गुणवंत लोक मागे पडत असून त्याची कदर सरकार न करता आरक्षण देत आहे, असे या मोर्चेकऱ्यांनी म्हटले आहे.

या मोर्चात जिल्हा भरातील नागरिक सहभागी झाले होते. सरकारला जागे करण्याचा प्रयत्न या मोर्चातून कण्यात आला. सरकारने या मागणीचा सकारात्मक विचार करावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सेव्ह मेरिट सेव्ह नेशन कृती समितीतर्फे देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details