महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राख्या बनवून सैनिकांसाठी पाठवल्या, पाटणबोरी येथील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम

पाटणबोरीद्वारा संचालित श्री. शिव छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशाच्या सीमेचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी स्वतः राख्या तयार करून, रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा एक स्तुत्य उपक्रम नुकताच राबवला आहे.

राख्या बनवून सैनिकांसाठी पाठवल्या, पाटणबोरी येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उपक्रम
राख्या बनवून सैनिकांसाठी पाठवल्या, पाटणबोरी येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उपक्रम

By

Published : Aug 21, 2021, 6:16 PM IST

यवतमाळ - जनसेवा मंडळ पाटणबोरीद्वारा संचालित श्री. शिव छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशाच्या सीमेचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी स्वतः राख्या तयार करून, रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा एक स्तुत्य उपक्रम नुकताच राबवला आहे.

पाटणबोरी येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राख्या बनवून सैनिकांना पाठवल्या. त्याबाबत बोलताना शिक्षक सचिन जोशी

'सैनिकांविषयी आत्मीयतेची भावना वृद्धिंगत व्हावी'

देशाच्या सीमेचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांविषयी आत्मीयतेची भावना अधिकाधिक वृद्धिंगत व्हावी या अनुषंगाने विद्यालयातील विद्यार्थिनींनी आणि विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या घरी तयार करून, त्या विद्यालयात एकत्रित केल्या. त्या संपूर्ण राख्यांचे एकत्रीकरण करुन विद्यालयातर्फे या राख्या सैनिकांना पाठविण्यात आलेल्या आहेत. यासाठी या उपक्रमाचे संयोजक सचिन जोशी यांनी परिश्रम घेतले. त्यांना या कामासाठी विद्यालयातील शिक्षिका शिल्पा पत्की आणि संगीता वानखेडे यांचे सहकार्य लाभले.

राख्या बनवून सैनिकांसाठी पाठवल्या, पाटणबोरी येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उपक्रम

'विद्यार्थ्यांना दिले होते विषय'

आम्ही विद्यार्थ्यांना सैनिकांसाठी राखी पाठवण्याचे आवाहन केले होते. यासाठी तिरंगा, भारत माता, भारत देश अशा प्रकारचे विषय राखी बनवण्यासाठी दिले होते. त्याला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. मुख्याध्यापक देवानंद येरकडे यांच्याकडे या राख्या सुपूर्द करण्यात आल्या. विद्यालयातील माजी विद्यार्थी स्वप्नील मोहिजे हा लेह लद्दाखमध्ये सैनिक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्यापर्यंत या राख्या पोचवण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details