महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळ येथे महावितरणच्या विरोधात ठिय्या आंदोलन

आर्णी शहरात सतत एक महिनापासून अनियमित वीज पुरवठा होत आहे. नियमित वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी नगरसेवक निलकुंश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी उपकार्यकारी अभियंता नरेंद्र राऊत यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले.

यवतमाळ येथे महावितरणच्या विरोधात ठिय्या आंदोलन

By

Published : Aug 3, 2019, 8:37 AM IST

यवतमाळ- आर्णी शहरात सतत एक महिनापासून अनियमित वीज पुरवठा होत आहे. नियमित वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी नगरसेवक निलकुंश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी उपकार्यकारी अभियंता नरेंद्र राऊत यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले.

यवतमाळ येथे महावितरणच्या विरोधात ठिय्या आंदोलन

यावेळी आंदोलनकर्त्यांनी महावितरणच्या अनागोंदी कारभार विरोधात घोषणा बाजी केली. आर्णी शहरामध्ये गेल्या महिन्या भरापासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. अनियमित वीज पुरवठा होत असल्याने शहरातील पाणी पुरवठ्यावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. परिनामी नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला समोर जावे लागत आहे. त्यातच विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने शासकीय व खाजगी कार्यालयात नागरिकांच्या कामात खोळंबा होत आहे. या प्रकारामुळे नागरिकासह व्यापारी मोठ्या अडचणी येत असल्याने नगरसेवक निलकुंश चव्हाण यांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी महावितरणचे उप कार्यकारी अभियंता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details