महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्तुत्य उपक्रम : महिला करतात मनोरुग्णांची सेवा, त्यांना आंघोळ घालणे, उपचार अन् बरंच काही... - मनोरुग्ण सेवा यवतमाळ

रस्त्याने फिरणाऱ्या महिला किंवा पुरुष मनोरुग्णाला हे सदस्य पकडतात. रुग्णांना खाद्यपदार्थ किंवा पैशाचे आमिष देतात आणि आपल्या कार्यालयावर आणतात. त्याठिकाणी त्यांची अंघोळ घालून देतात, त्यांना नवीन कपडे घालून देतात. हे सर्व करत असताना हे मनोरुग्ण खूप त्रास देतात. कधी कधी ते शिव्याही देतात. अशा ही स्थितीत या महिलांनी आपले कार्य चालूच ठेवले आहे.

महिला करतात मनोरुग्णांची सेवा, त्यांना आंघोळ घालणे, उपचार अन् बरंच काही...
महिला करतात मनोरुग्णांची सेवा, त्यांना आंघोळ घालणे, उपचार अन् बरंच काही...

By

Published : Jan 25, 2020, 7:19 PM IST

यवतमाळ -मनोरुग्ण म्हटले तर अनेकजण त्यांच्यापासून लांबच राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र, शहरातील प्रतिसाद फाऊंडेशनच्या महिलांनी संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून या मनोरुग्ण तरुणांची सेवा करण्याचा उपक्रम राबवला आहे. त्यामुळे त्यांच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.

रस्त्याने फिरणाऱ्या महिला किंवा पुरुष मनोरुग्णाला हे सदस्य पकडतात. रुग्णांना खाद्यपदार्थ किंवा पैशाचे आमिष देतात आणि आपल्या कार्यालयावर आणतात. त्याठिकाणी त्यांची अंघोळ घालून देतात, त्यांना नवीन कपडे घालून देतात. हे सर्व करत असताना हे मनोरुग्ण खूप त्रास देतात. कधी कधी ते शिव्याही देतात. अशा ही स्थितीत या महिलांनी आपले कार्य चालूच ठेवले आहे.

स्तुत्य उपक्रम : महिला करतात मनोरुग्णांची सेवा, त्यांना आंघोळ घालणे, उपचार अन् बरंच काही...

मनोरुग्णांना कोणीही जवळ घेत नाही. त्यांना नातेवाईक सुद्धा नाकारतात. अशावेळी या महिला मनोरुग्णांना आपले नातेवाईक समजून मदतीचा हात देत आहेत. सख्ख्या नातेवाइकाप्रमाणे वागणूक देत आहेत. घरातील एखाद्या सदस्याप्रमाणे या महिला त्यांची सेवा करीत असतात. मात्र, हे काम करत असताना काहीजण त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघतात. मात्र, त्यांची चिंता न करता या महिलांनी हे कार्य सुरू ठेवले आहे. या मनोरुग्णांवर यवतमाळमधीलच रुग्णालयात उपचार केले जात आहे. हे काम करण्यासाठी त्यांना कुटुंबीयांचे देखील तेवढेच पाठबळ मिळते. त्यामुळे त्यांना काम करण्यासाठी अधिक प्रोत्साहन मिळते.

दिवसेंदिवस मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी कोणीतरी काम करावे म्हणून प्रतिसाद फाउंडेशनने पाऊल उचलले आहे. सेवा प्रतिसाद फाउंडेशनच्या सदस्यांनी आतापर्यंत साडेचारशे ते पाचशे मनोरुग्णांची सेवा केली. मनोरुग्णांना पकडून त्यांना आंघोळ घालणे, त्यांना रुग्णालयात नेऊन उपचार करणे आणि पुनर्वसनाच्यादृष्टीने वृद्धाश्रमात पाठविणे हे काम या फाऊंडेशनचे सद्स्य करीत असतात. समाजाने सुद्धा आता या मनोरुग्णांच्या सेवेसाठी आमच्या पाठिशी उभे राहावे. तसेच त्यासाठी शक्य ती मदत करावी. मनोरुग्णाच्या मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रतिसाद फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details