महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बसस्थानकाच्या आवाराला डबक्याचे स्वरूप; प्रवाशांना करावी लागते तारेवरची कसरत - प्रवासी

यवतमाळ जिल्ह्यातील बसस्थानकाच्या आवारात पावसामुळे खड्यात पाणी साचून तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

बसस्थानकाच्या आवाराला डबक्याचे रूप

By

Published : Jun 30, 2019, 5:30 PM IST

यवतमाळ- जिल्ह्यातील बसस्थानकाच्या आवारात पावसाळा आला की आवारातील खड्ड्यात पाणी साचून तलावाचे स्वरुप प्राप्त होते. त्यामुळे येणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. तसेच या खड्ड्यांमुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बसस्थानकाच्या आवाराला डबक्याचे रूप

एसटी प्रशासनाकडून या खड्यात मुरुम टाकला जातो. त्या मुरुमावरुन जड वाहन गेले तर तिथे चिखल तयार होतो. त्याच चिखलातून प्रवाशांना ये-जा करावी लागते. त्यामुळे तिथे एसटी महामंडळाने डांबरीकरन करावे. तसेच बसस्थानकच्या आवारात व समोरच्या भागात रिक्षा व इतर अवैध प्रवासी वाहने यांची गर्दी वाढलेली आहे. जी प्रवाशांना वेटीस धरुन अवैध प्रवास करावयास भाग पाडते. हा सगळा प्रकार एसटी महामडंळ उघड्या डोळ्यांनी रोजच पाहतो. तरी प्रवाशांच्या सोईसाठी यावर प्रतिबंध कारवाई करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

जिल्ह्यामध्ये १६ बसस्थानके

यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ, नेर, दारव्हा, राळेगाव, पांढरकवडा, वनी, उमरखेड, पुसद, दिग्रस, बाभूळगाव, मारेगाव, आर्णी, घाटंजी, कळंब, महागाव, झारीजामनी असे १६ बसस्थानके आहेत. या बसस्थानकांची स्थिती ही अशाच प्रकारची आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details