यवतमाळ- सूर्य आग ओकत आहे, उष्णतेने शरिराची लाहीलाही होत आहे. त्यामुळे सर्व जण पावसाची चातकाप्रमाणे वाट बघत आहेत. जून महिना सुरू झाला असला तरी अद्याप आवकाळी पाऊसही आलेला नाही. नदी, नाले, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत. यासंपूर्ण परिस्थितीवर पोलीस विभागातील एक शिपाई आपल्या पहाडी आवाजात पावसाला आर्जव करत आहे. याचा एका व्हिडिओ सध्या जबरदस्त व्हायरल होत आहे.
'तू येरे पावसा, तू येरे पावसा...' वर्दीतल्या दर्दीची पावसासाठी आर्जव - व्हिडिओ व्हायरल
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवर पोलीस विभागातील एक शिपाई आपल्या पहाडी आवाजात पावसाला आर्जव करत आहे. याचा एका व्हिडिओ सध्या जबरदस्त व्हायरल होत आहे.
गीत गाताना पोलीस शिपाई व अन्य
हा पोलीस शिपाई कोणत्या ठाण्यामध्ये कार्यरत आहेत, त्याचे नाव काय हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, त्याच्या पहाडी आवाजातील या गीताने यवतमाळ जिल्ह्यात सर्वांना भुरळ घातली आहे.