यवतमाळ - अरुणावती प्रकल्पात विष प्रयोग झाल्याच्या घटनेला दोन दिवस होत नाहीत, तोपर्यंत गोकी या मध्यम प्रकल्पात विषप्रयोग करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या संदर्भात तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे. मत्स्य व्यवसायिकांनी दोषींवर कारवाईची मागणी जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाकडे केली आहे.
मासेमारीसाठी अरुनावती पाठोपाठ गोकी धरणात विषप्रयोग, कारवाईची मागणी - कंत्राटदार कंपनी
या प्रकल्पामध्ये जलचर प्राण्यांचा मृत्यू झाल्याची बाब कंत्राटदार कंपनीच्या लक्षात आली आहे. अवैध मासेमारी करता व व्यावसायिक स्पर्धेतून धरणाच्या पाण्यात असे विषप्रयोग होत आहेत.
या प्रकल्पामध्ये जलचर प्राण्यांचा मृत्यू झाल्याची बाब कंत्राटदार कंपनीच्या लक्षात आली आहे. अवैध मासेमारी करता व व्यावसायिक स्पर्धेतून धरणाच्या पाण्यात असे विषप्रयोग होत आहेत. गोकी धरणाच्या ८६० हेक्टर क्षेत्रातून मत्स्य व्यवसायासाठी गोपालकृष्ण भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेला मासेमारीचे कंत्राट देण्यात आले आहे. या प्रकल्पामध्ये सदस्यांकडून गस्त असतानाही पाण्यात विषाचा प्रयोग झाला आहे. विशेष म्हणजे गोकी धरणातून यवतमाळ शहरात देखील पाणीपुरवठा होतो. त्यामुळे विषप्रयोगाच्या तक्रारीमुळे नागरिकांमध्ये देखील धास्ती निर्माण झाली आहे.
भातात विष मिसळून ही मासेमारी होत असल्याची माहिती आहे. विषप्रयोगाने मृत मासे बाजारात विकले जात आहे का? याबाबत देखील तपासणीची आवश्यकता आहे. गोकी व अरुणावती प्रकल्पातील मासे आणि झिंगे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत कारवाईची मागणी मत्स्य व्यवसायिकांनी केली आहे.