महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 31, 2021, 5:30 PM IST

ETV Bharat / state

स्वस्त धान्य दुकानात मिळालेली मका तहसील कार्यालयासमोर फेकून निषेध, गहू देण्याची मागणी

यवतमाळमधील घाटंजी येथे स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना मका देण्यात आली. याचा निषेध करत नागरिकांनी तहसील कार्यालयासमोरच ही मका फेकून दिली.

स्वस्त धान्य दुकानात मिळालेली मका तहसील कार्यालयासमोर फेकून निषेध, गहू देण्याची मागणी
स्वस्त धान्य दुकानात मिळालेली मका तहसील कार्यालयासमोर फेकून निषेध, गहू देण्याची मागणी

यवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातून मका हे धान्य मिळाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी घाटंजी तहसील कार्यालयासमोर मका फेकून रोष व्यक्त केला. स्वस्त धान्य दुकानातून मकाऐवजी गहू हेच धान्य देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मका नको गहू द्या

यवतमाळमधील घाटंजी येथे स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना मका देण्यात आली. याचा निषेध करत नागरिकांनी तहसील कार्यालयासमोरच ही मका फेकून दिली. स्वस्त धान्य दुकानातून मका देऊन गरीबांची थट्टा करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. हे आमचे अन्न नाही. ज्वारी, गहू हे विदर्भातील जनतेचे अन्न आहे असे सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यावेळी म्हणाले. यावेळी स्वस्त धान्य दुकानातून गहू दिला जावा अशी मागणी करण्यात आली.

स्वस्त धान्य दुकानातून गहू देण्याची मागणी करण्यात आली
हा शासनाचा धोरणात्मक निर्णयस्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना 15 किलो गहू, 20 किलो तांदूळ वितरित करण्यात येतो. मात्र, शासनाने शेतकऱ्यांकडून जानेवारीत महिन्यात जे कडधान्य खरेदी केले. ते वितरित करण्याचे आदेश असल्याने मार्च आणि एप्रिल महिन्यात गव्हाची कपात करून 10 किलो मका, पाच किलो गहू वितरित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असल्याने ते वितरित करीत असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी यावर बोलताना सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details