महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोरांची शिकार करणाऱ्या 3 कामगारांना अटक, एका मोरासह 3 किलो मांस जप्त

लॉकडाऊन दरम्यान रेल्वे कामगारांनी मोराची शिकार केल्याचे समोर आले आहे. ओडिसा राज्यातील हे कामगार असून काम बंद असल्याने ते कळंब तालुक्यात अडकले आहेत.

yavatmal news
लॉकडाऊन दरम्यान रेल्वे कामगारांनी मोराची शिकार केल्याचे समोर आले आहे.

By

Published : Apr 6, 2020, 10:24 PM IST

यवतमाळ -लॉकडाऊन दरम्यान रेल्वे कामगारांनी मोराची शिकार केल्याचे समोर आले आहे. ओडिसा राज्यातील हे कामगार असून काम बंद असल्याने ते कळंब तालुक्यात अडकले आहेत. मोराची शिकार करत असल्याची माहिती जोडमोहा वनविभागाला मिळाली. त्यानुसार वनविभागाने केलेल्या कारवाईत सुनील दुला करमी (21), कन्हा पुडीया मरकम(20), रावलिंगा रावपोडीया राऊ(37) या तिघांना अटक केली असून त्यांच्याडून एका मोरासह तीन किलो मोराचे मांस जप्त करण्यात आले आहे.


गेल्या काही महिन्यांपासून वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गाचे काम सुरू असून कळंब येथे रेल्वेमार्गासाठी मातीकाम व पूल उभारण्याचे काम चालू आहे. याठिकाणी कंत्राटदाराने ओडिसा येथील कामगार आणले असून सध्या ते लॉकडाऊनमुळे याच ठिकाणी अडकले आहेत.

दरम्यान, संबंधित कामगार मोराची शिकार करून त्याचे मांस खात असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार जोडमोहाचे तीन वनाधिकारी चंदू गावंडे यांनी पथकासह छापा मारल्यानंतर एका मृत मोरासह तीन किलो मोराचे मांस आढळले. याप्रकरणी संबंधित तीन कामगारांना अटक करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details