महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिक्षक मतदारसंघात शिक्षकच उमेदवार हवा; शिक्षक संघटनांची मागणी - yavatmal teacher union news

अमरावती शिक्षक मतदारसंघांमध्ये निवडणूक सुरू आहे. परंतु या निवडणुकीत राजकीय पक्षांचा हस्तक्षेप वाढत असल्याने शिक्षकांचा प्रतिनिधी हा शिक्षकच असावा, असा पावित्रा शिक्षक संघटनांनी घेतला आहे.

only-teachers-should-be-candidates-in-the-teacher-constituency-election-demanded-teacher-unions-in-yavatmal
शिक्षक मतदारसंघात शिक्षकच उमेदवार हवा; शिक्षक संघटनांची मागणी

By

Published : Dec 1, 2020, 4:06 PM IST

यवतमाळ - अमरावती शिक्षक मतदारसंघांमध्ये राजकीय पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. मात्र, शिक्षक मतदारसंघात उमेदवार हा शिक्षकच असावा. त्यालाच शिक्षकांच्या प्रश्नांची, मागण्याची जाण आहे, असा सूर विविध शिक्षकांच्या संघटनांनी आज मतदानाच्या दिवशी आळवला. सर्व शिक्षक संघटना एकत्र येत राजकीय पक्षांची मक्तेदारी या मतदारसंघातून मोडीत काढण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी केला.

ईटीव्ही भारत रिपोर्ट
शिक्षक मतदारसंघात राजकीय पक्षांचा हस्तक्षेप -
घटनेने महाराष्ट्र विधानसभेसाठी 288 जागा या निर्धारीत केल्या आहेत. विधानपरिषदेवर विविध घटकाला प्रतिनिधित्त्व मिळावे, यासाठी काही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यातीलच शिक्षक मतदारसंघात शिक्षकांचा उमेदवार असायला हवा. मात्र, राजकीय पक्ष आपले उमेदवार या मतदारसंघात उभे करीत आहेत. ज्यांचा शिक्षणाशी तीळमात्रही संबंध नाही, असे उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांचा हस्तक्षेप या मतदारसंघातून निघावा, यासाठी शिक्षकांच्या सर्व संघटना एकवटल्या आहेत.
शिक्षक संघटनांसाठी अस्तित्वाची लढाई -
राजकीय पक्षांनी या मतदारसंघात आपले उमेदवार ठेवल्याने धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई या शिक्षक मतदारसंघात आहे. शिक्षकांचे प्रश्न हा शिक्षकच सभागृहात मांडू शकतो. त्याला सर्व प्रश्नांची जाण असते. जर या मतदारसंघात इतर उमेदवारांनी पाय रोवले तर शिक्षकांचे अस्तित्त्वच संपुष्टात येईल, असाही सूर यावेळी शिक्षक संघटनेच्यावतीने काढण्यात आला. त्यामुळे काहीही झाले, तरी राजकीयपक्षाला या मतदारसंघात थारा न देता शिक्षकांचा प्रतिनिधीच जावा, याकरिता सर्व संघटना एकवटल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details