यवतमाळ - ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था किती असंवेदनशील आहे, हे दाखवून देणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील वणी येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. विजय मारोती दानवे, असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
धक्कादायक! वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णाचा सरकारी रुग्णालय परिसरात मृत्यू - Dr. Awari
ग्रामीण रुग्णालयात दानवे यांना भरती करून न घेता हाकलून देण्यात आले, असा आरोप त्यांच्यासोबतच्या व्यक्तीने केला
विजय दानवे याला उपचारासाठी ज्ञानेश्वर बोरसेट्टीवर यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले. ग्रामीण रुग्णालयात दानवे यांना भरती करून न घेता हाकलून देण्यात आले, असा आरोप त्यांच्यासोबतच्या व्यक्तीने केला. दानवे हा रुग्णालयाच्या परिसरात रात्रभर झोपून होता. त्यानंतर रुग्णालय परिसरातच उपचाराअभावी त्याचा मृत्यू झाला. त्या व्यक्तीच्या संदर्भात डॉ. आवारी यांना माहिती दिली असता त्यांनी हा रुग्ण मद्यप्राशन करून आल्याचे सांगितले. या घटनेला डॉ. भालचंद्र आवारी व प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.