यवतमाळ -आदिवासी समाजाला कुठलेही निकष न लावता खावटी कर्ज मंजूर करण्यात यावे, तसेच घाटंजी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि गोंडवाना संग्राम परिषद यांच्यावतीने सोमवारी बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव आणि नूकसानग्रस्त शेतकरी सहभागी झाले होते.
आदिवासी समाजाला खावटीचा लाभ मिळण्यासाठी शासनाने अनेक जाचक अटी लावल्यामुळे, गोंड समाज व इतर आदिवासी जमाती खावटीपासून वंचित आहेत. खावटीवर आदिवासी समाजाचा हक्क आहे, त्यांना त्यांच्या हक्काची खावटी मिळालीच पाहिजे, तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांवर दुपार पेरणीचे संकट ओढावले होते. त्यातच शेतकऱ्यांना कर्जमाफी देखील झाली नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, सीसीआईची कापूस खरेदी सुरू करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
खावटी कर्ज म्हणजे काय?