यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 50 हजारांच्या पार गेल्यानंतर आज (गुरुवार) सुध्दा कोरोनाबाधितांपेक्षा जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. 24 तासात 919 जण बाधित तर 983 जण कोरोनामुक्त झाले आहे. जिल्ह्यात एकूण 16 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आरोग्य विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार गुरुवारी एकूण 6686 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहे. यापैकी 919 जण नव्याने बाधित आले तर 5767 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. तसेच 24 तासात जिल्ह्यात 983 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
6937 सक्रिय रुग्ण
सद्यस्थितीत जिल्ह्यात 6937 सक्रिय बाधित रुग्ण असून यापैकी रुग्णालयात भरती 2804 तर गृह विलगीकरणात 4133 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण बाधित रुग्णांची संख्या 59634 झाली आहे. 24 तासात 983 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 51282 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1415 मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर 13.10 तर मृत्यूदर 2.37 आहे.
557 पुरुष आणि 362 महिला कोरोनाबाधित