यवतमाळ - जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. या सभेला जिल्हा भरातून बचत गटांच्या महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. रामदेव बाबा लेआऊट येथे सुरू असलेल्या या सभेतील गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी १० ते १२ महिलांचे मंगळसूत्रे चोरली आहेत. तर अनेक महिलांच्या पर्सही लांबवल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी काही महिलांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मोदींच्या सभेत चोरांचा सुळसुळाट; अनेक महिलांचे मंगळसूत्र चोरीला
जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. या सभेला जिल्हा भरातून बचत गटांच्या महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. सभेच्या ठिकाणी पाण्याची बाटली वा कुठलीच वस्तू नेण्यास बंदीही घालण्यात आली होती. तरीही चोरट्यांनी मोठ्या शिताफीने हात साफ केला आहे. आलेल्या २० ते २२ महिलांच्या पर्स चोरीस गेल्या. तर करंजीजवळील आमडी गावातील एका वृद्ध महिलेचे १० ग्रॅमचे मंगळसूत्र चोरीला गेले आहे, अशा प्रकारे जवळपास १० ते १२ महिलांचे मंगळसूत्र चोरीला गेले आहे. याबाबत पांढरकवडा पोलिसात महिलांनी तक्रार दिल्या असून, पांढरकवडा पोलीस अधिक तपास करत आहेत.