यवतमाळ- जंगलात सरपण आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर रानडुकराने हल्ला केल्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यु झाल्याची घटना आर्नी तालुक्यातील दाभडी जंगलात घडली. संतोष सुकरू राठोड ( ३५ वर्षे रा. तेंडोळी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
यवतमाळ : रानडुकराच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
संतोष हे घरातील चूल पेटविण्यासाठी लाकडे आणण्यासाठी जंगलात गेले होते. दरम्यान, रानडुक्कराने त्यांच्या गुप्तांगावर जोरदार धडक दिली. त्यात संजय हे गंभीर जखमी झाले होते.
मृत संतोष सुकरू राठोड
संतोष हे घरातील चूल पेटविण्यासाठी लाकडे आणण्यासाठी जंगलात गेले होते. दरम्यान, रानडुक्कराने त्यांच्या गुप्तांगावर जोरदार धडक दिली. त्यात संजय हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ आर्नी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले. संतोष यांच्या पश्च्यात मूली व पत्नी असा असा परिवार आहे.