यवतमाळ- अंगणात खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीला घरात नेऊन युवकाने तिच्यावर अतिप्रसंग केला. ही खळबळजनक घटना वडगाव जंगल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामनगर येथे घडली.
अल्वपयीन मुलींवरील वाढत्या अत्याचाराला 'राम'नगर सुद्धा अपवाद नाही - यवतमाळमधील रामनगर
रामनगर या गावात अल्पवयीन मुलगी खेळत असताना नितीनची नजर तिच्यावर गेली. टीव्ही दाखविण्याचे आमिष दाखवून तो मुलीला घरात घेऊन गेला आणि अतिप्रसंग केला. ही घटना उघडकीस आल्यावर गावात खळबळ उडाली.
rape
नितीन उर्फ नितेश राठोड (29) असे आरोपीचे नाव आहे. रामनगर या गावात अल्पवयीन मुलगी खेळत असताना नितीनची नजर तिच्यावर गेली. टीव्ही दाखविण्याचे आमिष दाखवून तो मुलीला घरात घेऊन गेला आणि अतिप्रसंग केला. ही घटना उघडकीस आल्यावर गावात खळबळ उडाली. मुलीच्या पालकांनी वडगाव जंगल पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यावरून आरोपी नितीन राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला.