यवतमाळ- पांढरकवडा तालुक्यातील कवठा येथील खुनी नदीच्या पुरात एकजण वाहून गेल्याची घटना आज सकाळी घडली आहे. कालीदास बळीराम ठाकरे (41) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सुरेश कव्हाले घनास्थळी दाखल झाले. त्यांचा शोध घेण्यासाठी 15 जवानांचे जिल्हा शोध बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून शोध कार्य सुरू करण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील खुनी नदीच्या पुरात एकजण गेला वाहून; शोध कार्य सुरू
पांढरकवडा तालुक्यातील कवठा येथाल कालीदास बळीराम ठाकरे (41) हे फिट आल्यामुळे खुनीनदीत सकाळच्या सुमारास पडले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सुरेश कव्हाले घनास्थळी दाखल झाले. त्यांचा मृतदेह शोधण्यासाठी 15 जवानांचे जिल्हा शोध बचाव पथक रवाना करण्यात आले आहे.
यवतमाळ येथील खुनी नदीत एकजन गेले वाहुन
कालिदास ठाकरे हे नदी ओलांडत होते. मात्र त्याच वेळी त्यांना अचानक फिट(आजार) आली. यात ते नदीच्या पाण्यात पडले आणि वाहून गेले. त्यांचा शोध घेण्यात आहे.