मुंबई/यवतमाळ -राज्य शासनाने 30 माकडे (रेसस प्रजातीची) पकडण्याची परवानगी दिली आहे. या माकडांवर कोरोनावरील लसीचे प्रयोग करण्यात येणार आहेत, अशी माहिती पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) शनिवारी (दि.6जून) दिली.
रेसस प्रजातीच्या माकडांचा वापर विविध रोगांवरी लसीच्या संशोधनासाठी केला जातो. ही माकडे मुख्यत्वे दक्षिण आणि पूर्व अशियामध्ये आढळतात. कोणत्याही लसीचा प्रयोग करण्यासाठी ऱ्हेसस प्रजातीच्या 4 ते 5 वर्षांच्या माकडांचा वापर केला जातो, अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.