यवतमाळ - संचारबंदीचे उल्लंघन करून अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या वणी येथील अक्षरा रेस्टॉरंट अँड बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच साई इंटरप्राईजेस या देशी दारूच्या मुख्य डीलरचा परवाना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी रद्द केला आहे.
लॉकडाऊनच्या काळात दारू विकणाऱ्यांवर कारवाई; परवाने कायमस्वरुपी रद्द - lockdown in yavatmal
संचारबंदीचे उल्लंघन करून अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या वणी येथील अक्षरा रेस्टॉरंट अँड बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच साई इंटरप्राईजेस या देशी दारूच्या मुख्य डीलरचा परवाना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी रद्द केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 नुसार मद्यविक्री करण्यास पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करून अक्षरा रेस्टॉरंट अँड बारचे 5 जण मद्य विक्री करतांना आढळून आले. या कारवाईत एकून 4 लाख 23 हजार रूपयांची विदेशी दारू पोलिसांनी जप्त केली. यासह इमारतीसमोर वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी इकोफोर्ट कार आणि एक दुचाकी असा एकून 14 लाख 73 हजारांचा माल पोलिसांनी जप्त केलाय. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
तर साई इंटरप्राईजेस हे रात्रीच्या सुमारास देशी दारूच्या पेट्या विक्री करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. राज्य उत्पादन शुल्क यांनी लॉकडाऊनच्या दारू विक्री करणाऱ्याचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी ही कारवाई करत दोन्ही दुकानांचे दारूचे परवाने रद्द केले आहेत.