यवतमाळ - जिल्ह्यात मागील 24 तासात 1 हजार 105 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 810 रुग्ण बरे झाले आहेत. तर दिवसभरात 38 जणांचा मृत्यू झाला. यातील 27 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तीन कोविड केयर सेन्टर आणि नऊ जणांचा मृत्यू खासगी रुग्णालयातील आहे. रविवारी 4 हजार 6689 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात 39 मृत्यूसह 1 हजार 105 नव्या रुग्णांची नोंद
रविवारी एकूण 5 हजार 774 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1 हजार 105 जण नव्याने पॉझेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 228 रुग्णांवर उपचार सुरु असून यापैकी 2 हजार 790 रुग्णालयात तर 3 हजार 438 रुग्ण गृह विलगीकरणात आहे. मागील 24 तासात 810 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 40 हजार 469 इतकी आहे.
जिल्ह्यातील रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोरोना मुक्त होण्याच्या तुलनेत बाधितांची संख्या जास्त आहे. रविवारी एकूण 5 हजार 774 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1 हजार 105 जण नव्याने पॉझेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 228 रुग्णांवर उपचार सुरु असून यापैकी 2 हजार 790 रुग्णालयात तर 3 हजार 438 रुग्ण गृह विलगीकरणात आहे. मागील 24 तासात 810 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 40 हजार 469 इतकी आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 हजार 112 मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा रुग्ण संख्येचा दर 12.36 टक्के असून मृत्यूदर 2.33 टक्के इतका आहे.