यवतमाळ - घाटंजी महीला तहसीलदार पुजा मोटाळे आणि त्यांच्या पथकाने घाटंजी तालूक्यात रेती व मुरूम चोरट्यांवर कारवाई केली आहे.
तालुक्यातील गौण खनिज चोरीचे प्रमाण वाढले असून रेतीचे घाट हर्रासा पासून वंचीत आहे. मात्र, चोरट्यांनी अर्ध्याच्यावर रेतीचे ऊत्खनन करून हा घाट रीकामा केला आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी तहसीलदार पूजा माटोडे यांनी विवीध प्रतीबंधात्मक योजना राबविल्या आहेत. तळनी - घाटंजी रोडवरून रेतीने भरलेले तिन ट्रॅक्टर आढळून आल्याने पथकाने कार्यवाई करून घाटंजी पोलीस ठाण्यात रेतीने भरलेल्या गाड्या जप्त केल्या आहेत. यावेळी गाडी मालक प्रणव भारती, अक्षय मस्के आणि बंडु डभांरे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
यवतमाळ: महिला तहसीलदारांची रेती चोराट्यांवर धडक कारवाई
तळनी - घाटंजी रोडवरून रेतीने भरलेले तिन ट्रॅक्टर आढळून आल्यामुळे पथकाने कार्यवाई करून घाटंजी पोलीस ठाण्यात रेतीने भरलेल्या गाड्या जप्त केल्या आहेत
धडक कारवाई