यवतमाळ - बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण हिचा पुणे येथे संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पूजावर यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आल्याची माहिती पुणे येथील वाणवाडी पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने वानवाडी पोलिसांनी यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात भेट देऊन अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांना एक पत्र दिले. याबाबत विचारणा केली असता, ही माहिती गोपनीय असून सांगू शकत नसल्याची प्रतिक्रिया कांबळे यांनी दिली.
माहिती देताना अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे हेही वाचा -केंद्राचा अर्थसंकल्प आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणारा; धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केले मत
पूजा चव्हाण की, दुसरी कोणी, तपासात होईल स्पष्ट
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण आता अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे. नेमका मृत्यू कसा झाला, याबद्दल मतप्रवाह आहे. या प्रकरणात एका मंत्र्याचे नाव येत असल्याने हे प्रकरण हायप्रोफाईल झाले आहे. दोन ते पाच फेब्रुवारी दरम्यान पूजा अरुण राठोड या नावाने एका तरुणीवर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आल्याची नोंद आहे. मात्र, ती मुलगी पूजा चव्हाण की, दुसरी कोणी, हे स्पष्ट झाले नाही. वानवाडी पोलिसांनी अधिष्ठाता यांना एक पत्र देऊन महिती मागविली आहे. तर, रुग्णालयात पूजा चव्हाण नावाची रुग्ण भरती नव्हती, अशी माहिती अधिष्ठाता यांनी दिली.
हेही वाचा -संजय राठोड यांची बदनामी थांबवा; महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मागणी