यवतमाळ - सहा महिन्याच्या अर्भकाला खताच्या ढिगात गाडल होते. मात्र, कुत्र्याने हे पाप उघडकीस आणले. घाटंजी तालुक्यातील ससानी गावात ही घटना घडली. ससानी गावा बाहेरील शेणखताच्या ढिगारा कुत्र्यांनी ऊकरून कापडात गुडांळलेले ६ महिन्याचे स्त्री-जातीचे अर्भक बाहेर काढले.
कुत्र्यामुळे गाडलेले पाप उघडकीस; ६ महिन्याचे अर्भक सापडले खताच्या ढिगात - Yavatmal
गावच्या सरपंचानी ही बाब घाटंजी पोलिसांना कळवली. हा प्रकार कळताच ठाणेदार शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार उद्धव टेकाम यांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले. या मुलीचे माता-पिता कोण आहेत. याचा पोलीस शोध घेत आहेत.
जेव्हा ही बाब लोकांच्या लक्ष्यात आली, तेव्हा बघणाऱ्यांची गर्दी उसळली होती. गावच्या सरपंचानी ही बाब घाटंजी पोलिसांना कळवली. हा प्रकार कळताच ठाणेदार शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार उद्धव टेकाम यांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले. या मुलीचे माता-पिता कोण आहेत. याचा पोलीस शोध घेत आहेत. मृत अर्भकाला न्याय मिळावा आणि गुन्हेगारांना शिक्षा मिळावी यासाठी गावातील लोकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन ठाणेदारांनी केले आहे.