यवतमाळ - यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात अध्यात्मिक गुरू म्हणून ओळखले जाणारे सुनील नटराजन नायर उर्फ प्रेमासाई महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज प्रेमासाई महाराज यांनी पहिला उमेदवारी अर्ज दखल करून श्री गणेशा केला आहे.
यवतमाळमधून सुनील नटराजन यांचा अपक्ष अर्ज दाखल - menka gandhi
केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांना यवतमाळमध्ये आणून भाजप नेत्यांशी असलेली जवळीक त्यांनी दाखवून दिली होती. मात्र, भाजप-शिवसेनेची युती झाल्याने त्यांचा हिरमोड झाला. प्रेमासाई यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करीत विद्यमान खासदार भावना गवळी यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.
प्रेमासाई महाराज हे गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी स्वतः जाहीर केले होते. सुरुवातीला भारतीय जनता पक्षाकडून माझी उमेदवारी नक्की आहे, असे सांगून राजकीय खळबळ त्यानी उडवली होती. केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांना यवतमाळमध्ये आणून भाजप नेत्यांशी असलेली जवळीक त्यांनी दाखवून दिली होती. मात्र, भाजप-शिवसेनेची युती झाल्याने त्यांचा हिरमोड झाला. प्रेमासाई यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करीत विद्यमान खासदार भावना गवळी यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. गेल्या २० वर्षात कुठलाही विकास झाला नाही, जनतेची कामे करण्यासाठी मी उमेदवारी दाखल केली असल्याचे त्यानी सांगितले. प्रेमासाई महाराज यांची आधीची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी असल्याचे म्हटल जाते. याबाबत त्यांना विचारणा केली असता माझ्यावर एकही गुन्हा सिद्ध झाला नाही, असे सांगितले. आता महाराज यांच्या उमेदवारीने राजकीय गणिते बिघडतात का? हे पाहणे महत्वाचे आहे.