यवतमाळ - मागील आठवड्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्याने उन्हाच्या झळा कमी झाल्या होत्या. मात्र, एप्रिल अखेर उष्णतेचा पारा 42 अंशावर जाऊन पोहोचल्याने दुपारच्या सुमारास रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे. रात्रीचा हलका गारवा कायम असला तरी दिवसा उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या आहेत.
यवतमाळमध्ये उन्हाचा कडाका.. एप्रिल अखेर सूर्य ओकतोय आग, पारा 42.2 अंशावर - april
गेल्या पाच दिवसांत 39 ते 40 अंश तापमान हे 41 ते 42.2 अंशापर्यंत कमाल वाढल्याने दुपारनंतर रस्त्यावरुन फिरताना उन्हाचे चटके बसत आहेत. शहरात मंगळवारी दिवसभरात कमाल 42.2 अंश सेल्सिअस तर किमान 27 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
गेल्या पाच दिवसांत 39 ते 40 अंश तापमान हे 41 ते 42.2 अंशापर्यंत कमाल वाढल्याने दुपारनंतर रस्त्यावरुन फिरताना उन्हाचे चटके बसत आहेत. शहरात मंगळवारी दिवसभरात कमाल 42.2 अंश सेल्सिअस तर किमान 27 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर तापमान थेट 42 अंशापार गेल्याने उन्हाच्या काहिलीने शहरवासीय हैराण झाले आहेत.
उन्हाची दाहकता वाढू लागल्याने त्याचा परिणाम रस्त्यावर जाणवू लागला आहे. नागरिक सकाळी ११ पर्यंत आपली कामे आटोपून दुपारनंतर बाहेर पडण्याचे टाळत आहेत. उन्हाचा ज्वर वाढल्याने टोपी, रुमाल याच्या विक्रीत देखील वाढ झाली आहे. नागरिक घराबाहेर पडताना उन्हाच्या काहिलीपासून स्वतःचे संरक्षण व्हावे यासाठी काळजी घेत आहेत. शहरात ठिकठिकाणी रसवंती, शीतपेय, आईस्क्रीम यांची दुकाने सुरू झाली असून, कडाक्याच्या ऊन्हापासून काहीसा दिलासा मिळावा म्हणून नागरिक या दुकानात गर्दी करीत आहेत. येत्या काही दिवसांत पारा अजून वाढण्याची शक्यता आहे.