यवतमाळ - जिल्ह्यात वाढत असलेली कोरोनाची रुग्णसंख्या लक्षात घेता खासदार भावना गवळी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय येथील लेडी हार्डींग हॉस्पिटलची पाहणी केली. यावेळी दहा दिवसांत हे रुग्णालय तयार करण्याच्या सुचना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंग तृषार वारे व संबंधित बांधकाम अधिकाऱ्यांना दिल्या. येत्या 10 दिवसांत जर हॉस्पिटल कोरोना रूग्णांसाठी तयार झाले नाही, तर सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात येईल, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
वायुसेनेच्या माध्यमातून ऑक्सिजन द्यावे-