यवतमाळ - जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बोरीअरब जवळील हदगाव येथे घरगुती वादातून पतीने कुर्हाडीचे घाव घालून पत्नीची हत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. यात सोनू युवराज कचरे (वय ३०) हिचा जागीच मृत्यू झाला.
घरगुती वादातून पत्नीचा कुऱ्हाडीचा घाव घालून खून - police
नागपुरात घरगुती वादातून पतीने पत्नीचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. या हल्ल्यात तिचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी लाडखेड पोलिसांना दिली.
घरगुती वादातून पत्नीचा कुऱ्हाडीचा घाव घालून खून
सकाळी पत्नीशी वाद झाल्यानंतर सोनू शेताकडे निघाली होती. संतापलेल्या पतीने तिला शेत-शिवारात एकटीला गाठून तिच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घेतले. या हल्ल्यात ती ती जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी लाडखेड पोलिसांना दिली. कचरे कुटुंबाला १० वर्षाचा मुलगा व ७ वर्षाची मुलगी आहे. ही घटना घरगुती वादातूनच घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पती युवराज कचरे याला अटक केली असून, या घटनेचा तपास लालखेड पोलीस ठाणे करीत आहे.