यवतमाळ- कोरोनाच्या प्रादूर्भावास नियंत्रित करण्यासाठी लॉकडाऊन सुरू असल्याने सर्वच कामे आणि व्यवहार ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होऊ नये यासाठी दिग्रस नगरीतील नागरिक पुढे सरसावले आहे. हिंदू एकता समितीच्या माध्यमातून शहरात पाच हजार चारशे शिदा मदत किट वितरित करण्यात आले आहेत.
हिंदू एकता समितीतर्फे गरजूंना मदत, पाच हजार शिधा किटचे वाटप - corona in maharashtra
हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होऊ नये यासाठी दिग्रस नगरीतील नागरिक पुढे सरसावले आहे. हिंदू एकता समितीच्या माध्यमातून शहरात पाच हजार चारशे शिदा मदत किट वितरित करण्यात आले आहेत.
५ किलो गहू, १ किलो बेसन, १ किलो तेल, अर्धा किलो साखर, चहापावडर अशा साहित्याचा या किटमध्ये समावेश आहे. हिंदू एकता समितीच्या शेकडो स्वयंसेवकांनी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून अत्यावशक सामान गोळा केले. यानंतर कीट तयार करून शहरातील वेगवेगळ्या भागात नियोजन करून वाटप केले.
यासाठी शहरातील दानशूर व्यक्ती, सामाजिक व सेवाभावी संस्था यांनीदेखील मदत केली. शहरातील गरजूंचा आकडा न कळल्याने अजूनही अनेकजण मदतीपासून वंचित आहेत. अशांना शहरातील दानशूर व्यक्तींकडून पुन्हा मदत उभी करून दुसऱ्या टप्पयात शिदा मदत कीट वाटणार असल्याची माहिती हिंदू एकता समितीच्यावतीने देण्यात आली.