यवतमाळ- गांधी चौकातील रूक्मिणी पांडूरंग देवस्थानच्या वतीने सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ५० हजार रूपयांची मदत करण्यात आली. यासाठीचा धनादेश संस्थानचे उपाध्यक्ष डॉ. दिनकर बडे यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हा यांच्याकडे दिला. देवस्थानकडून १ लाख रूपयांची मदत करणार असून लवकरच आणखी ५० हजारांचा धनादेश देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रूक्मिणी पांडूरंग देवस्थानकडून पूरग्रस्तांसाठी मदत - कोल्हापूर
यवतमाळच्या गांधी चौकातील रूक्मिणी पांडूरंग देवस्थानच्या वतीने सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ५० हजार रूपयांची मदत करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांना धनादेश देताना
संकट काळात देवस्थानाने पुढे आले पाहिजे. आपल्या धार्मिक उत्पनातील दोन टक्के वाटा मदतीसाठी देण्यास पुढे आले पाहिजे, असा संदेशच रूक्मिणी पांडुरंग देवस्थानाने दिला आहे. रुक्मिणी पांडुरंग देवस्थानने काल (गुरूवार) ५० हजार रुपयांचा धनादेश दिला असून लवकरच पुन्हा ५० हजारांचा मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार असल्याचेही यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिनकर बडे यांनी सांगितले.