यवतमाळ -यावर्षी पावसाळ्यात सुरुवातीपासूनच मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे कपाशीचे बोंड काळे पडले, तर उभ्या सोयाबीनच्या शेंगातून अंकुर फुटू लागले. यातून शेतकरी कसाबसा सावरत नाही तर आता कापूस आणि सोयाबीन काढणीच्या वेळेस पावसाने पुन्हा जोर पकडल्याने शेतात असलेले उभ्या पिकाचे पुन्हा पाण्यामुळे नुकसान होत आहे. हातातोंडाशी आलेले पीक जाताना पाहून शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. पीक घरात येण्यावेळी पाऊस चांगलाच बरसला. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.
प्रतिक्रिया देताना शेतकरी शेतकरी संकटात -
सध्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. शनिवारी सकाळीच आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली. सध्या शेतातून कापूस निघत आहे. नवीन कापूस फुटत आहे. पावसामुळे तो काळा पडण्याची आणि बॉंड सडण्याची भीती व्यक्त होत आहे. सोयाबीन पिकांची गंजी लावून असून, मशिनद्वारे काढण्यात येत आहे. शेतकरी सकाळी झोपेत असताना पावसाला सुरुवात झाली. दिवसभर पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने शेतकऱ्यांची चांगलीच दाणादाण उडाली. आकाशात ढग कायम असून, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे.
हेही वाचा -कलम 370 हटल्याने काश्मीर घाटीत विकासाचे मार्ग खुले झाले - मोहन भागवत