यवतमाळमध्ये आरोग्य यंत्रणा कोलमडली; रुग्णांना बेड मिळेना - यवतमाळमध्ये आरोग्य यंत्रणा कोलमडली
आता खासगी डॉक्टर यांची सेवा व हॉस्पिटल अधिग्रहित करण्याचे वेळ आली आहे. जिल्हा आरोग्य विभागाचे ग्रामीण भागात 66 प्राथमिक आरोग्य केंद्र तर 438 प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. तर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यलयामार्फत 18 तालुके आरोग्य रुग्णालय, तीन उपजिल्हा रुग्णालय असून या ठिकाणी कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी केवळ जिल्हा रुग्णालयात पाठवत असल्याने जिल्हा रुग्णालयावर ताण पडलेला आहे.
यवतमाळ रुग्णालय
यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. तसा आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. 30 लाख लोकसंख्येचा भार जिल्हा शासकीय रुग्णालयाचे कोरोना हॉस्पिटल, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि 17 खासगी कोव्हिड हॉस्पिटलवर आलेला आहे. मात्र, ही आरोग्य यंत्रणा तोकडी पडत असून सर्व हॉस्पिटल पूर्णपणे फुल झाले आहे. रुग्णांना उपचारासाठी वेटिंगवर राहावे लागत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून बेड मिळेना, अशी परिस्थिती रुग्णांची झालेली आहे.