महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टिपेश्वर मधील जिप्सीचालक व गाईड निलंबित; वाघाचा रस्ता अडविल्याप्रकरणी कारवाई - yavatmal breaking news

एका पर्यटकाने व्हिडिओ व्हायरल केला असून व्हिडीओमधून ही बाब पुढे आली. त्यावरून विभागीय वनअधिकारी सुभाष पुराणिक यांनी तीनही जिप्सीवरील चालक व गाईड यांना निलंबित केले.

टिपेश्वर अभयारण्य
टिपेश्वर अभयारण्य

By

Published : Jan 31, 2021, 7:07 PM IST

यवतमाळ - पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यातील पर्यटनादरम्यानचे नियम पायदळी तुडविणाऱ्या व समोरून येणाऱ्या वाघाचा रस्ता अडवून धरणाऱ्या तीन जिप्सी, त्यावरील चालक व गाईड यांना विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) सुभाष पुराणिक यांनी तडकाफडकी निलंबित केले. तीन वेगवेगळ्या जिप्सी घेऊन पर्यटकांनी टिपेश्वर अभयारण्यात प्रवेश केला होता.

टिपेश्वर अभयारण्य
50 मीटर अंतराची मर्यादा ओलांडली-जिप्सी चालक किरण मडावी व गाईड सागर एंबडवार यांनी त्यांच्यापुढे एक जिप्सी उभी असताना 50 मीटर अंतराची मर्यादा ओलांडून त्या जिप्सीच्या अगदी जवळ आपले वाहन उभे केले. त्यामुळे तेथे असलेल्या वाघाचा रस्ता अडवून धरला गेला. एवढेच नव्हे तर निर्धारीत रस्ता सोडून बाजूला जंगलात वाहन नेले. तेथे वाघ उभा असल्यामुळे तेथून आपले वाहन पुढे नेण्याऐवजी त्याच ठिकाणी थांबवून ठेवले.

त्यानंतर तेथे आलेल्या आणखी एका जिप्सीचा चालक संदीप मेश्राम व गाईड मन्सूर शेख यांनी त्यांच्या जिप्सीसमोर उभा असलेला वाघ तेथून निघून गेल्यानंतरही आपले वाहन पुढे नेले नाही. यासोबतच त्या ठिकाणी आलेल्या चौथ्या जिप्सीचा चालक गजानन बुर्रेवार व गाईड नागेश्वर मेश्राम यांनी समोर वाघ दिसत असतानाही आपले वाहन 50 मीटरपेक्षा कमी अंतरावर नेले.

व्हायरल व्हिडीओमधून पुढे आली बाब-

एका पर्यटकाने हा व्हिडिओ व्हायरल केला असून व्हिडीओमधून ही बाब पुढे आली. त्यावरून विभागीय वनअधिकारी सुभाष पुराणिक यांनी तीनही जिप्सीवरील चालक व गाईड यांना निलंबित केले. यातील एका जिप्सीचा चालक किरण मडावी व गाईड सागर एंबडवार या दोघांना जिप्सीसह 28 फेब्रुवारीपर्यंत निलंबित करण्यात आले. तर उर्वरित दोन जिप्सींवरील चालक व गाईडला 14 फेब्रुवारीपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा-'नीट राहा, नाहीतर गोळ्या घालीन' शेतकरी नेते अजित नवलेंना धमकी

ABOUT THE AUTHOR

...view details