यवतमाळ- घाटंजी तालुक्यातील शारी येथे वीज पडून तरुणी ठार झाली. ही घटना मंगळवारी सायंकाळीच्या सुमारास घडली. रत्नमाला कोवे (19) असे मृत युवतीचे नाव आहे. ती आपल्या शेतात वडिलांसोबत शेत कामासाठीसाठी गेली होती.
वीज पडून तरुणी ठार; घाटंजी तालुक्यातील घटना - दुर्दैवी घटना
सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. या पावसात वीज पडून ही घटना घडली आहे.
वीज पडून ठार झालेली तरुणी.
मात्र, सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. या पावसात वीज पडून ही घटना घडली आहे. या आठवड्यात वादळी वाऱ्यात वीज पडून मृत्यू झालेल्यांची संख्या आता 4 वर पोहोचली आहे.
नैसर्गिक आपत्ती विभागाकडून अशा वातावरणात बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे .