यवतमाळ - जिल्ह्यातील राळेगाव तहसील कार्यालयासमोर भरधाव येणाऱ्या टिप्परणे धडक दिल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. परंतु, टिप्पर पळत गेल्याने त्याचा शोध घेणे सुरू आहे. मृत महिलेचे नाव सुमन बाबाराव काळे (६५) असे आहे.
रस्ता ओलांडताना टिप्परची जबर धडक, महिलेचा जागीच मृत्यू - टिप्पर अपघात
राळेगाव तहसील कार्यालयासमोर भरधाव येणाऱ्या टिप्परने धडक दिल्याने एका महिलेचा जागीच ठार झाली. तर सदर टिप्पर पळत गेल्याने त्याचा शोध घेणे सुरू आहे.
टिप्परच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू
मृत महिला ही आपल्या पतीसोबत तहसील कार्यालयात कामानिमित्त आली होती. रस्ता ओलांडत असताना टिप्परने धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. तहसील कार्यालयासमोर अतिक्रमण असल्यामुळे आणि रस्ता लहान झाल्याने हा अपघात झाला, असे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्वरित रोडवरील अतिक्रमण न काढल्यास परत अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर, धडक दिलेला टिप्पर वेगाने निघून गेल्याने त्याचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.