यवतमाळ- दारव्हा तालुक्यातील देऊळगाव (वळसा ) येथे तेरवीचे जेवण केल्यानंतर ३० जणांना विषबाधा झाली आहे. ही घटना बुधवारी (१ मे) दुपारी घडली. विषबाधेनंतर रुग्णांना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
देऊळगाव येथे एका परिवाराकडे तेरवीचा कार्यक्रम होता. याठिकाणी काही जणांनी भर उन्हात जेवण केले. तर काहींनी संध्याकाळी तेच जेवण घेतले. त्याचबरोबर बॅरलचे पाणी संपल्याने गावातील विहिरीचे पाणी पिण्यात आले. त्यानंतर २५ ते ३० जणांना उलटी व जुलाबचा त्रास सुरू झाला. त्यामुळे सर्वांना दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.