महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये त्र्याऐंशी वर्षांपासून जळतेय देवीची अखंड ज्योत - यवतमाळ

यवतमाळ येथील दत्त चौकात गेल्या 1942 या वर्षांपासून देवीची अखंड ज्योत जळत आहे. ज्योत अखंड जळत राहावी यासाठी भाविक भक्त पुरेपूर काळजी घेतात. या ठिकाणी भाविकांची श्रद्धा आहे. ज्योत तेवत ठेवण्यात 83 वर्षांच्या कालावधीत खंड पडलेला नाही. यंदा साध्या पध्दतीने दुर्गा देवीची घटस्थापना झाली.

ळतेय देवीची अखंड ज्योत
ळतेय देवीची अखंड ज्योत

By

Published : Oct 8, 2021, 11:03 PM IST

यवतमाळ - यवतमाळ येथील दत्त चौकात गेल्या 1942 या वर्षांपासून देवीची अखंड ज्योत जळत आहे. ज्योत अखंड जळत राहावी यासाठी भाविक भक्त पुरेपूर काळजी घेतात. या ठिकाणी भाविकांची श्रद्धा आहे. ज्योत तेवत ठेवण्यात 83 वर्षांच्या कालावधीत खंड पडलेला नाही. यंदा साध्या पध्दतीने दुर्गा देवीची घटस्थापना झाली.

यवतमाळमध्ये त्र्याऐंशी वर्षांपासून जळतेय देवीची अखंड ज्योत
बब्बी पहिलवान यांनी प्रज्वलित केली ज्योत बब्बी पैलवान यवतमाळचे नामांकित मल्ल होते. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी दत्त चौक मध्ये घटस्थापना करून ही ज्योत पेटवली होती. मात्र, आता या घटनेला 83 वर्ष पूर्ण झाले तरी आजतागायत ती तेवतच आहे. त्यांच्या दोन मुली शालिनी व मालीनी या चंद्रपूर व घुगुस येथे नोकरीला आहे. मात्र, त्या घटस्थापनेला आवर्जून यवतमाळला येतात. घट व देवीची स्थापना करतात. या तेवत असलेल्या ज्योतीची नित्यनियमाने दर मंगळवारी आरती करण्यात येते. संपूर्ण विदर्भातील भाविक या देवीच्या दर्शनासाठी येतात. अनेक भाविकांची मनोकामना या ठिकाणी पूर्ण होत सांगण्यात आले. हेही वाचा -चलो 'रामोजी'! पर्यटकांनी फुलली जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी

ABOUT THE AUTHOR

...view details