यवतमाळ : महागाव तालुक्यातील मुडाणा येथील भिमराव पाईकराव यांच्या शेतातील गोठ्याला आणि घराला आग लागल्याची घटना रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत 7 शेळ्यांची पिल्ले आणि 40 पेक्षा अधिक कोंबड्यांचा होळपळून मृत्यू झाला आहे.
यवतमाळ; गोठ्याला आणि घराला भीषण आग; शेळ्यांसह कोंबड्या जळून खाक - यवतमाळ लेटेस्ट न्यूज
महागाव तालुक्यातील मुडाणा या गावाजवळून जाणाऱ्या नागपूर-तुळजापूर मार्गावरील शिवतेज हॉटेलच्या मागे भिमराव पाईकराव हे मागील 25 वर्षापासून शेतातील घरातच राहत होते. पत्नी आणि मुलगा सुधाकर हे रात्री झोपेत असताना अचानक घराला आग लागली. बाजूलाच गोठा सुद्धा होता. त्यात जवळपास 60 शेळ्या व कोंबड्या ठेवल्या होत्या.
गोठ्याला आणि घराला भीषण आग
घरातील अन्नधान्य गोठ्यातील कोंबड्या, बकऱ्याचां जळून कोळसा.
गोठ्यातील शेळ्याची 7 पिल्ले तसेच 40 कोंबड्या आणि घरातील 35 हजार रोख रक्कम आगीत भस्मसात झाले. नागरिकांनी आग विजविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, या आगीत संपूर्ण गोठा व घर जळून खाक झाले. मात्र, आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.