यवतमाळ - घाटंजी तालुक्यातील पार्डी येथे भगवान साखरकर व पुजारी साखकर यांच्या मालकीच्या गावातील गोठ्याला अचानक आग लागली. या आगीने लगतच्या तीन घरांनादेखील विळख्यात घेतले. यात गोठा व घरांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेत कुठलीच जीवितहानी झाली नाही.
हेही वाचा -पुण्यातल्या धायरी औद्योगिक वसाहतीत भीषण आग, कोट्यवधी रुपयांचे नुकसान
दोन बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण
या आगीमध्ये दुर्गाबाई टेकाम, वसंत पवार, सूर्यभान कोहळे यांच्यासुद्धा घरांनी पेट घेवून घरातील साहित्य जळून खाक झाले. तसेच दीनेश साखरकर यांच्यासुद्धा घराला आगीने कवेत घेवुन संपुर्ण घर जळून खाक झाले. या घटनेची माहिती तहसील व घाटंजी पोलिसांना मिळताच घटनास्थळावर धाव घेऊन अग्निशामक दलाच्या दोन बंबाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. यामध्ये लाकूड फाटा प्लास्टिक पाईप, जनावरांचा चारा व इतर घरगुती सामान, अन्नधान्य, साहित्य संपूर्ण जळून खाक झाले आहे. यात जवळपास पाच ते सहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे. ही आग कशाने लागली हे अद्याप कळू शकले नाही.
हेही वाचा -पॅन-आधार लिंक नसेल तर 10 हजारापर्यंत भरावा लागू शकतो दंड; आज शेवटची तारीख