यवतमाळ - नेर तालुक्यातील इंद्रठाणा शिवारातील एका कठडे नसलेल्या विहिरीत 15 नीलगायी पडल्या. नीलगायींना जीवित बाहेर काढण्यासाठी वनविभागाने शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल पाच तास चाललेल्या या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सर्व नीलगायींना सुखरूप बाहेर काढून त्यांना जीवदान देण्यात वनविभागाला यश झाले.
जेसीबीच्या सहाय्याने काढले बाहेर...
विहिरीत पडलेल्या पंधरा नीलगायींना जीवदान - वनविभाग
नेर तालुक्यातील इंद्रठाणा शिवारातील एका कठडे नसलेल्या विहिरीत 15 नीलगायी पडल्या. नीलगायींना जिवंत बाहेर काढण्यासाठी वनविभागाने शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल पाच तास चाललेल्या या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सर्व नीलगायींना सुखरूप बाहेर काढून त्यांना जीवदान देण्यात वनविभागाला यश झाले.
इंद्रठाणा शिवारात वनक्षेत्रालगत मोहन किसन राठोड यांचे शेत आहे. या शेतात त्यांनी तीस फूट खोलीची विहीर खोदली आहे. त्यांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने ते विहिरीचे बांधकाम करू शकले नाही. पाण्याच्या शोधात असलेल्या नीलगायींचा एक कळप या शेतातून जात होता. अचानकपणे कठडे नसलेल्या या तीस फुटाच्या खोल विहिरीत सर्व कळप पडला. एकाच वेळी तब्बल पंधरा नीलगायींना बाहेर काढणे हा अत्यंत मोठा व जिकिरीचा विषय होता. दोरखंडाची जाळी करत त्या जाळीमध्ये एका एका नीलगायीला अटकवून जेसीबीच्या माध्यमातून वर काढण्यात यश आले.