यवतमाळ- दिग्रसपासून जवळच असलेल्या सावळी या गावात पिता-पुत्राचा जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला. शेतात शिमला मिरची या पिकाला पाणी देत असताना शॉक लागून हा अपघात झाला. यामध्ये दत्ता खंडुजी उर्फ मारोती गवळी (वय, 55 रा. सावळी, ता. मानोरा), विजय दत्ता गवळी (वय 25) अशी मृत्यू झालेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत.
पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू - शॉक
दिग्रसपासून जवळच असलेल्या सावळी या गावात पिता-पुत्राचा जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला.
शेतात शिमला मिरचीला पाणी देत असताना शेतातून गेलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या पोलमधून निघालेल्या तारेचा शॉक लागून हे दोघे जागीच बेशुद्ध पडले. त्यांच्यासोबत कामाला असलेल्या अजय व जगदीश यांनी त्यांना तत्काळ दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी दिग्रसचे ठाणेदार उदयसिह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल शालिक राठोड, प्रकाश नाटकर, महिला पोलीस स्वाती सोळुंके पुढील तपास करत आहेत.