महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कापूस-तूर खरेदी सुरू; मात्र, जाचक अटी शेतकऱ्यांच्या पथ्यावर!

लॉकडाऊनच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कापूस, तूर, चणा, सोयाबीन या नगदी पिकांची खरेदी सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले. मात्र शासनाच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांचा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे समोर आले आहे.

yavatmal farming news
शासनाच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांचा मनःस्ताप सहन करावा लागत असल्याचे समोर आले आहे.

By

Published : Apr 21, 2020, 6:09 PM IST

यवतमाळ - लॉकडाऊनच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कापूस, तूर, चणा, सोयाबीन या नगदी पिकांची खरेदी सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले. मात्र शासनाच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांचा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे समोर आले आहे. पणन महासंघाने कापूस खरेदी सुरू केली असून एका दिवशी केवळ १० गाड्यांना टोकन देण्यात येत आहे. अशातच बाजार समितीत तीन हजारांवर शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली असल्याने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी होण्याचे शक्यता मंदावली आहे. तसेच वाहनांच्या खर्चाचा भुर्दंडदेखील शेतकऱ्यांना बसत आहे.

तूर व हरभरा केवळ चार दिवस तर सोयाबीन व गहू एकच दिवस विक्री करता येणार आहे. प्रत्येक दिवशी एका अडत्याकडून फक्त चार शेतकऱ्यांचाच लिलाव स्वीकारण्यात येणार असल्याने प्रक्रिया किटकट झाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.

यामुळे शेतमाल विकणे अवघड झाले आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. कापूस, तूर यांची अशीच खरेदीचे धोरण राहिल्यास बियाणे खते खरेदी व मजुरांचे पैसे कसे द्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details