महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळ जिल्ह्यात ४ दिवसात कोरोनाचे अकरा मृत्यू - 186 New Corona Patient Yavatmal

जिल्ह्यात सलग चार दिवसांपासून मृत्यूचे प्रमाण वाढले असून आज पुन्हा तीन मृत्यूंसह आकडा 11 वर पोहचला आहे. तर, आज 186 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वॉर्ड, कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ सेंटर या तिन्ही सेंटरमध्ये भरती असलेल्या 131 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

Corona patient Yavatmal
कोरोना रुग्णसंख्या यवतमाळ

By

Published : Feb 28, 2021, 9:42 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात सलग चार दिवसांपासून मृत्यूचे प्रमाण वाढले असून आज पुन्हा तीन मृत्यूंसह आकडा 11 वर पोहचला आहे. तर, आज 186 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वॉर्ड, कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ सेंटर या तिन्ही सेंटरमध्ये भरती असलेल्या 131 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मृत व्यक्तींमध्ये यवतमाळ येथील 76 वर्षीय पुरुष, महागाव येथील 62 वर्षीय पुरुष आणि मारेगाव तालुक्यातील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

यवतमाळ जिल्ह्यात १८६ नवे कोरोना रुग्ण आढळले

हेही वाचा -अकोला जिल्ह्यातील संचारबंदीचा विदर्भ चेंबर्स असोसिएशनने केला विरोध

1 हजार 112 रिपोर्ट झाले प्राप्त

पॉझिटिव्ह आलेल्या 186 जणांमध्ये 112 पुरुष आणि 74 महिला आहेत. यात यवतमाळातील 82 रुग्ण, पुसद येथील 60, दिग्रस 12, पांढरकवडा 15, वणी 5, दारव्हा 1, घाटंजी 4, महागाव 3, नेर 2, उमरखेड 1 आणि 1 इतर रुग्ण आहेत. आज 1 हजार 112 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 186 जण नव्याने पॉझिटिव्ह आले, तर 926 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.

सद्यस्थितीत 1 हजार 554 जण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 554 जण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 17 हजार 516 झाली आहे. 24 तासांत 131 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 15 हजार 500 आहे. तर, जिल्ह्यात एकूण 462 मृत्यूंची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 1 लाख 62 हजार 899 नमुने पाठविले असून, यापैकी 1 लाख 61 हजार 117 प्राप्त, तर 1 हजार 782 अप्राप्त आहेत. तसेच, 1 लाख 43 हजार 601 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आले आहेत.

हेही वाचा -अकोला परिमंडळात 48 तासात 340 वीज चोरांवर वीज वितरण कंपनीची कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details