यवतमाळ - दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांच्या वाहनासमोर एक दिव्यांग युवक झोपून अचानक आडवा झाल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, आपल्या भागातील रस्त्याचे प्रलंबित कामासाठी त्याने हे पाऊल उचलले. त्यानंतर वाहने थांबवून संजय राठोड यांनी चर्चेचे आश्वासन दिले. भास्कर वाघमारे असे गाडीसमोर झोपलेल्या दिव्यांग युवकाचे नाव आहे.
आमदार संजय राठोड हे दिग्रस विश्रामगृहावर जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी आले होते. भेट न झाल्याने वैभव नगरातील दिव्यांग भास्करने चक्क झोपून आमदार संजय राठोड यांची गाडी शासकीय विश्रामगृहातून बाहेर निघता वेळी अडविली. वैभव नगरातील भास्कर वाघमारे हा दिव्यांग युवक राठोडांच्या भेटीसाठी आपली समस्या घेऊन आला होता. मात्र बराच कालावधी होऊन त्याला भेट मिळाली नाही.
निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणीची मागणी-
आमदार राठोड हे विश्रामगृह बाहेरच्या दिशेने वाहन घेऊन निघाल्याने दिव्यांग भास्करने राठोडांच्या वाहनापुढे चक्क झोपून त्यांचा रस्ता अडविला. यावेळी लागलीच पोलिसांनी वाघमारे यास उठवून आमदार राठोड यांचाकडे घेऊन गेले. यावेळी भास्कर वाघमारे याने एकवेळ वैभव नगर येथे भेट देऊन नगरसेवकांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी करावी, अशी मागणी केली.